टिक टॉक अँप बंद करण्याचे केंद्र सरकारचे आदेश

0
222

नवी दिल्ली:
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सध्या सगळ्यांच्या आवडीचं ऍप कोणतं असं विचाराल तर एकमुखानं टिक टॉकचं नाव घेतलं जाईल. सिनेमाचे डायलॉग्स असो, गाणी असो किंवा म्युझिक, १५-३० सेकंदात फुल्ल धम्माल या टिक टॉकवर सुरु असते. सर्वसामान्यचं नाही तर सेलिब्रिटींनाही या ऍपनं भूरळ घातलीय.

दरदिवशी वाढत जाणाऱ्या फॉलोअर्समुळं तर प्रत्येकालाच आपण सेलिब्रिटी असण्याचा फिल येतोय, पण आता हे सगळं बंद होणाराय. कारण टिक टॉक ऍप गुगल आणि ऍपलवरुन डिलीट करायचे निर्देश केंद्र सरकारनं दिलेत. भारतात टीक टॉकचा गैरवापर होत असून अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येतोय. या अश्लिल मजकुरावर तात्काळ बंदी आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय. पण केंद्राच्या या निर्णयामुळं तरुणाईमध्ये नाराजी पसरलीय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here