बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

0
256

अकलूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येथे होणाऱ्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेने पंतप्रधानांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभुमीवर येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

सकाळी दहा वाजता पंतप्रधान मोदी यांची येथे सभा होणार आहे. या सभेच्या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. भाजपचे माढा मतदार संघातील उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि बारामती मतदार संघातील उमेदवार रंजना कुल यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, बारामती मतदारसंघाच्या उमेदवार रंजना कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here