खटक्यावर बोट ,जाग्यावर पलटी… २३ मे लाच कळेल

0
1556

गारगोटी -नितीन बोटे
लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे .राधानगरी ,भुदरगड, आजरा ,कागल,चंदगड,गड हीग्लज ,करवीर ,गगनबावडा रा,शिरोळ ,हातकलगले , पन्हाळा ,
तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे .कोण कोणाचं गेम करणार ,खटक्याव बोट ,जाग्यावर पलटी ,भाकरी परतणार का ?आमचं ठरलंय ,आम्ही भी ध्यानात ठेवलंय यामुळे प्रचारात रंगत आली आहे .
*राधानगरी ,भुदरगड, आजरा या राधानगरी मतदार संघावर मात्र दोन्ही उमेदवाराची करडी नजर आहे कारण याच मतदार संघाने धनंजय महाडिक यांना मागच्या निवडणुकीत उंचाकी 24,288 इतके मताधिक्य दिले होते .या मतदार संघात विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे .यामुळे प्रत्येक जण गावोगावी लोकसभेबरोबर विधानसभेचा प्रचार करताना दिसत आहे .निर्णायक भूमिका पुन्हा एकदा राधानगरी मतदार संघ बजावणार असल्याने या मतदार संघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे .*

कागल तालुक्याला राजकारणाचे विद्यापीठ समजले जाते. इथल्या सर्व निवडणुकांमध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेच्या निवडणूकीपर्यंत इथे पहायला मिळते ती म्हणजे टोकाची इर्षापण यावेळी मात्र चित्र उलटे पहायला मिळत आहे. लोकसभेचे मतदान अगदी पाच ते सहा दिवसावर येवूनही अजुन प्रचारात रंग दिसत नाही. काही मोजके कार्यकर्तेच प्रचारात दिसत आहेत. त्यामुळे ‘पोटात एक अन ओठावर एक अशी अवस्था हाय गा!’ असा सूर कट्यावरच्या गप्पातून येत आहे.
यावेळेस होणारी निवडणूक वेगळ्या पध्दतीने होताना दिसत आहे घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या प्रचाराऐवजी सोशल मीडीयावरील प्रचार जोर धरत आहे. समर्थक मंडळी दे दनादन पोस्ट व्हायरल करताना दिसत आहेत. कार्यकर्ते सोशल मीडियावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात गुंग असून समर्थकामधे मारामारी होते की काय अशी अवस्था आहे. ‘कोण बी उठतोय आणि काय बी टाकतोय ‘ अस असलं तरी खर कोणाला रुचेना झालंय. खालच्या पातळीवर जावून एकमेकांची उणे दुणे काढण्यात कार्यकर्ते आपली सर्व शक्ती वाया घालवत आहेत..! कार्यकर्ते प्रचारात सक्रीय दिसत नाहीत कारण गेले अनेक दिवस सुरु असणारे मांडवलीचे राजकारण सर्वसामान्य जनतेला समजले असुन नेते कधी ऐकमेकांच्या गळ्यात गळे घालतील सांगता येत नाही त्यामुळे गावातील नातेसंबंध न बिघडवता कार्यकर्ते हातात हात घालून हसत खेळत कुणालाही न दुखवता प्रचार करताना दिसत आहेत. पूर्वी असणारी टोकाची इर्षा बाजूला जावून राजकीय प्रगल्भता दिसत आहे . ‘काटा कीर्र !, खटक्याव बोट ! ,पैसा पसारला! ,आलीच सत्ता ! आवाज कुणाचा ! आमची लै हवा ! अशा अस्सल घोषणा मागे पडताना दिसत आहेत . विकासाच्या मुद्यापेक्षा वैयक्तीक टिका टिपणी अधिक भर दिसून येत आहे.
अस जरी सार असल तरी हे कागल आहे, कागलकरांच्या मनात काय आहे हे कळण सोप नाही. जिल्ह्याचा निकाल कागलवर अवलंबून आहे त्यामुळे इथला मतदार राजा ठरवून आहे काय करायचे ते . ‘आमच ठरलय !’ व ‘आमी बी ध्यानात ठेवलय’ यामुळे प्रचारात रंगत आली आहे. येत्या काही दिवसात वातावरण चांगलेच तापणार हे नक्की..२३ एप्रिलला कोणत्या खट्क्यावर बोट व कुणाची पलटी हे २३ मे लाच कळेल. एकंदरीत कोल्हापुरातील यावेळेच्या लोकसभेच्या निवडणूकित ‘तेरी भी चूप…मेरी भी चूप’ अशी असल्याने जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारी असून कोल्हापूरची ‘ कुस्ती’ कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.राधानगरी मतदार संघ व कागल मतदार संघ कोल्हापूरचा खासदार ठरवणार हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here