खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळेच कोल्हापूर जिल्हा विकासाच्या मुख्य प्रवाहात- नंदाताई बाभुळकर यांचे गौरवोद्गार

0
138

गडहिंग्लज:

गडहिंग्लज तालुक्यातील महागाव इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, नंदाताई बाभुळकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा जालिंदर पाटील, बी एन पाटील मुगळीकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यान्नावर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नंदाताई बाभुळकर म्हणाल्या, खासदार धनंजय महाडिक यांनी नेहमीच विकासात्मक दृष्टिकोन जपला असून त्यांच्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यात अनेक विकासकामांना गती मिळाली. विमानतळ, कोकण रेल्वे, पर्यायी शिवाजी पूल यासारखी अनेक काम खासदार धनंजय महाडिक यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वाला गेली. विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना विजयी करणं ही काळाची गरज असल्याचं नंदाताई बाभुळकर यांनी नमूद केलं. यावेळी विजय पाटील,उदय जोशी,नारायण चव्हाण, रायाप्पा करीगार, अमर चव्हाण,अजित देसाई, सागर देसाई, विठ्ठल कांबळे, दिलीप देसाई, तानाजी निकम, बशीर पठाण, शंकर घुगरे, दिग्विजय देसाई,दस्तगीर मुगळी यांच्यासह अन्य मान्यवर, शेकडो कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here