कार्यकर्त्यांचा मनात नेमकं दडलंय काय ? राधानगरी विधानसभा मतदार संघात चित्र; नेत्यांचा उमेदवारांना पाठींबा ,कार्यकर्त्यांचं काय ?

0
611

गारगोटी -नितीन बोटे
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत नेत्यांचा उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी जाहीर सभांचा धडाका सुरू आहे .मात्र कार्यकर्त्यांच्या मनात काय दडलंय हे मात्र कुणालाच माहीत नाही .एकूणच राधानगरी विधानसभा मतदार संघाचे वैशिष्ठ म्हणजे हा मतदार संघ एकाच्या बाजूने भरभरून मतदान करतो याचा अर्थ या परिसरात एकतर नकाराची किंवा होकाराची हवा जोरात वाहत असते.त्यामुळे संबंधित उमेदवाराला एकगठ्ठा मतदान मिळत असते याचा प्रत्यय गेल्यावेळच्या निवडणुकीत दिसून आला आहे .अलीकडे या विधानसभा मतदार संघामध्ये फार मोठे फेरबदल दिसून आले आहेत .यामुळे कोण कोणाचा सर्जिकल स्टाईक करणार हे निवडणूक निकालानंतर कळणार आहे.
राष्ट्वादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील ,माजी आमदार के पी पाटील ,जी प सदसू जीवन पाटील यांच्यात गटात धुसपुस चालू आहे . बिद्रीचे माजी व्हा चेअरमन विजयसिह मोरे ,माजी उपसभापती सत्यजित जाधव ,
गोकुळ संचालक अरुण डोगळे ,धेर्यशील देसाई , आदींच्या भूमिका उघड आहेत .काही नेते मतदार संघात उघड भूमिका घेत असले तरी त्यांच्या कार्यकरत्यांच्या मनात नेमकं काय दडलंय ?हे मात्र कोणाला सांगता येत नाही.एकूणच या मतदार संघात कोण कोणाचा सर्जिकल स्टाईक करणार याचे आतापासून आखाडे बांधले जाऊ लागले आहेत.
माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव यांनी गारगोटी येथे मेळावा घेऊन संजय मंडलिक यांना पाठींबा दिला.सतेज टीम राधानगरी भुदरगड आजरा मतदार संघ यांनीही आदमापूर येथे मेळावा घेऊन संजय मंडलिक यांना पाठींबा दिला .
भुदरगड ,राधानगरी मध्ये जिल्हा बँक ,गोकुळ ,बिद्री , भोगावती साखर कारखान्याच्या इफेक्ट
भुदरगड ,राधानगरी मतदार संघात कोणत्याही निवडणुकीत नेहमी केंद्र बिंदू असतो ते म्हणजे बिद्री साखर कारखाना ,गोकुळ ,जिल्हा बँक गोकुळ मध्ये भुदरगड तालुक्यात 3 संचालक आहेत धेर्यशील देसाई, विलास कांबळे, बाबा देसाई ,जिल्हा बँक संचालक रणजित पाटील,बिद्री चेअरमन के पी पाटील,प्रदीप पाटील,धोंडीराम मगदूम,धनाजीराव देसाई ,के ना पाटील ,मधुकर देसाई कृषी उत्त्पन्न बाजार समिती संचालक नाथाजी पाटील ,राधानगरी गोकुळ संचालक अरुण डोगळे ,पी डी धुदरे ,बिद्री संचालक ए वाय पाटील , बिद्री व्हा चेअरमन विठ्ठलराव खोराटे , भोगावती कारखाना चेअरमन उदयसिह पाटील कौलवकर ,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिंदुराव चौगले ,सदाशिव चरापले , माजी जी प शिक्षण सभापती अभिजित तायशेटे ,बावडा कारखाना संचालक सुधाकर साळोखे ,सह्यादी कारखाना चेअरमन आण्णासो नवणे ,असे नेते काम करत आहेत .राधानगरी विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने या मतदार संघाकडे कोणत्या पक्षाला मताधिक्य मिळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे .आजऱ्याचे नेते आण्णाभाऊ सस्था समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराठी यांचा पाठींबा नेमका कोणाला ?आजऱ्याचे नेते आण्णाभाऊ सस्था समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराठी यांचा पाठींबा नेमका कोणाला ?आजऱ्याचे नेते आण्णाभाऊ सस्था समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराठी यांचा पाठींबा नेमका कोणाला ?आजऱ्याचे नेते आण्णाभाऊ सस्था समुहाचे अध्यक्ष अशोक आण्णा चराठी यांचा पाठींबा नेमका कोणाला ?आघाडी व युती झाल्याने मतदार संघात गटबाजी व हेवेदावे हा प्रकार दोन्ही कडे सारखाच आहे .
नेते इकडे तिकडे करत आहे तर मात्र कार्यकत्यांच्या मनात नेमकं काय दडलंय असं चित्र राधानगरी मतदार संघात दिसत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here