आजरा बोलकेवाडीत १७ रोजी श्री जोतिबा यात्रा उत्सव.

0
325

आजरा ता. संभाजी जाधव. आजरा तालुक्यातील बोलकेवाडी येथे दि १७ रोजी श्री. जोतिबा देवालयात ब्रम्हादेवाची सत्यनारायनाची महापुजा व महाप्रसाद अयोजन केले आहे. या निमित्तानं कला क्रिडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे बोलकेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळ संचलित यांनी दि १८ व १९ रोजी अयोजन केलेल्या कार्यक्रमात कब्बडी स्पर्धा, रस्सीखेच, संगीत खुर्ची, सोगी भजन तसेच रात्रो ठिक ९ वा. बोलकेवाडी मंडळ मुंबई वतीने गावातील गुणवंत विद्यार्थीचा पारितोषिक वितरण समारंभ व गावातील मुलांचा कला दर्शनाचा कार्यक्रम ” चिमणी पाखरं ” असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दि १९ रोजी सायंकाळी ५ ते ९ पंर्यत महाप्रसाद असणार आहे. तरी श्री. जोतिबा यात्रे निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा पंचकृषीतील भाविक – भक्तानी लाभ घ्यावा असे अवाहन ग्रामस्थ मंडळ बोलकेवाडी व मुंबई मित्र मंडळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here