रिक्षा चालक म्हणजे शहराचा चालता-बोलता CCTV : बाबा इंदुलकर

0
117

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्यावतीने भाजपा रिक्षा संघटना अध्यक्ष श्री विजय गायकवाड व भाजपा उपाध्यक्ष श्री बाबा इंदुलकर यांच्या पुढाकाराने रिक्षा संघटनेचा मेळावा आयर्विन ख्रिश्चन हॉल येथे मोठ्या संख्येने उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविक विजय गायकवाड यांनी केले. तसेच नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रिक्षा चालकांसाठी केलेल्या कामांची माहिती उपस्थितांना दिली.
या प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष श्री बाबा इंदूलकर म्हणाले, रिक्षा चालक म्हणजे शहराचा चालता-बोलता CCTV आहे. सर्वप्रथम आपल्या व्यवसाय सांभाळून याठिकाणी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल सर्व रिक्षा बांधवांचे अभिनंदन केले. आज कोल्हापूर मध्ये २० हजार पेक्षा जास्त प्रवासी व मालवाहतूक करणारे रिक्षा व्यवसायीक आहेत. हा रिक्षा व्यवसाय असंघटीत स्वरूपामध्ये असल्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेली कुटुंबे अतिशय गरीबीत जीवन जगतात. कॉंग्रेसच्या ३० वर्षाच्या काळापेक्ष जास्त काम गेल्या ५ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून रिक्षा व्यवसायिकांच्यासाठी झाले आहे. रिक्षा चालकाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी दादांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरु आहेत. नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून या प्रश्नावर सविस्तर चर्चा केल्यानंतर या रिक्षा व्यवसायीकांसाठी पंडित दिनद्याल उपाध्याय सहकारी सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. सोसायटीच्या कामाच्या माध्यमातून भविष्यामध्ये रिक्षा व्यवसायाला लागणाऱ्या मुलभूत गरजा म्हणजे टायर्स, स्पेअर पार्ट, ऑईल, इन्शुरन्स इत्यादी गोष्टी बाजारभावापेक्षा कमी दराने उपलब्ध करून देण्यात येतील. यामुळे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा व महायुतीचे उमेदवार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here