चौकीदार चोर हैं’, या वक्तव्याबाबत राहुल गांधीना सुप्रीम कोर्टाची नोटीस

0
140

दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाबाबत केलेल्या दाव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर आता सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
‘आता सुप्रीम कोर्टदेखील म्हणत आहे की, चौकीदार चोर हैं’, या राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवत 22 एप्रिलपर्यंत आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. राहुल गांधींचं हे वक्तव्य खोटं आणि बदनामीकारक आहे, असं म्हणत निवडणूक आयोगाकडे देखील भाजपने देखील ही याचिका दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here