भाजप तर्फे घरेलू महिला कामगार यांचा भव्य मेळावा संपन्न

0
87

कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष श्री बाबा इंदूलकर व सौ भारती जोशी यांच्या पुढाकाराने आज महाराणा प्रताप चौक येथे घरेलू महिला कामगार यांचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास भाजपा प्रदेश प्रवक्त्या कांताताई नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचे प्रास्ताविक मारुती भागोजी यांनी केले.
याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेश प्रवक्त्या कांताताई नलावडे म्हणाल्या, देशातील महिलांमध्ये नरेंद्रजी मोदी या नावाची एक मोठी सुप्त लहर चालू आहे. स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच गेल्या ५ वर्षात ५ कोटी कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन मिळाली. याबद्दल त्या भगीणी हा मोदीजींचा गॅस असा उल्लेख करतात. मातृवंदन योजनेच्या माध्यमातून गरोदर पणाच्या काळात स्त्रीयांना उत्तम दर्जाचा खुराक मिळावा तसेच योग्य ते औषध उपचार मिळावेत यासाठी अत्यंत नेटके नियोजन केल्यामुळे देशातील अनेक भगिनींना याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला. बेटी बचावो…बेटी पढावो… या योजनेच्या माध्यमातून मुलींचा जननदर वाढवण्यासाठी व स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून फार मोठे प्रयत्न करण्यात आले त्यामुळेच त्यांचे चांगले परिणाम देशामध्ये दिसत आहेत. देशातील महिला व मुली सुरक्षित राहण्यासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक कडक कायदे करण्यात आले आहेत. देशातील असंघटीत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला वर्गाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून (सुकन्या समृद्धी, अटल पेन्शन, पंतप्रधान बिमा योजना) इ. अथक प्रयत्न सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. त्यामुळे या देशाला समृद्ध बनवण्यासाठी व विकासाचा नवीन आयाम गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासठी महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
या मेळाव्याला संबोधित करताना भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संदीप देसाई म्हणाले, येणारी लोकसभा म्हणजे मोठ्या परिवर्तनाची नांदी आहे. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मा.पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या पाच वर्षामध्ये भारत देशाचा राज्यकारभार चालवला आहे. पुन्हा एकदा मा. मा.नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना प.म.देवस्थान समिती अध्यक्ष श्री महेश जाधव म्हणाले, असंख्य योजनांच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे मा.नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत अशीच भावना देशातील सर्व सामान्य नागरीकांची आहे. देशातील महायुतीच्या सरकारला भक्कम स्थैर्य मिळवण्यासाठी आपण सर्वांनी आगामी काळात महायुतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांच्या धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे सूचित केले.
याप्रसंगी गणेश देसाई, हेमंत आराध्ये, बाबा इंदूलकर, विजय जाधव, अशोक देसाई या मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी वैशाली पसारे, रेश्मा शेख, सुवर्णा भोसले, छाया रनवरे, कमल माने, प्रियलता भोसले, मंगला निप्पानीकर, भारती जोशी, स्वाती कदम, सुनील सूर्यवंशी, रजनी भुर्के, कविता पाटील आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here