अन ! खासदार संभाजीराजे यांना पोहायचा मोह आवरला नाही

0
203

कोल्हापूर:कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यासाठी खासदार संभाजीराजे दोन दिवसाच्या चंदगड तालुक्यात दौऱ्यावर होते. प्रचारादरम्यान धलगरवाडी येथे रस्त्याकडेला असलेल्या नदीत पोहणारी मुले दिसली आणि संभाजी राजेंना नदीत पोहण्याचा मोह अवरता आला नाही.

खासदार संभाजी राजेंनी गाडी थांबवत कसलाही विचार न करता पाण्यात उडी मारली. सुरक्षा रक्षक मनाई करत असतानाही राजेंनी पाण्यात सूर मारला. खुद्द राजांना आपल्यामध्ये पाहून नदीत पोहत असलेल्या तरुणांनीसुद्धा भरपूर आनंद झाला. राजेंसोबत मौजमजा करीत पोहण्याचा आनंद मुलांनी लुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here