बँक बॅलन्सच्या बाबतीत बसपा देशात एक नंबर

0
224

नवी दिल्ली : देशभर लोकसभा निवडणुका तो तोंडावर असताना विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमुळे उमेदवारांकडे किती संपत्ती आहे, याची माहिती सर्वांना मिळाली पंरतु कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, याबाबतची माहितीदेखील निवडणूक आयोगाने समोर आणली आहे.

निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा बहुजन समाज पार्टीकडे (बसपा) सर्वाधिक बँक बॅलन्स आहे. मायावतींच्या बसपाकडे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून तब्बल 670 कोटी रुपये बँक बॅलन्स आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी (सपा) आहे. सपाकडे तब्बल 471 कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे. निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे. देशातील सर्वात मोठे पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष संपत्तीच्या बाबतीत बसपा आणि सपाच्या आसपासही नाहीत.यामुळे सर्वात मोठे पक्ष म्हणून भाजपा व काँग्रेस यांच्या कडे पाहिलं तरी बँक बॅलन्स च्या बाबतीत मात्र हे दोघेही मागेच आहे असे म्हणावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here