युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ ‘भाऊजी’ कोल्हापुरात

0
198

कोल्हापूर : भाजप सेनेचे कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ भाऊजी उर्फ आदेश बांदेकर यांनी आज कोल्हापुर येथे टाकाळा, राजारामपुरी या परिसरात प्रचार रँली काढली. मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसा प्रचारचाही वेग वाढू लागला आहे. धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्यात होणारी ही प्रमुख लढत आता अवघ्या महाराष्ट्राचा विषय बनला आहे. दोघांकडूनही अनेक दिग्गज नेते, अभिनेते यांना प्रचारण केलं जात आहे. आजच्या ह्या रँली मध्ये ‘आमचं ठरलंय’ या वाक्यांने सारा परिसर दणाणून गेला. ह्या रँली मध्ये शिवसेनचे नेते संजय पवार अग्रस्थानी होते, त्यांच्या सह हजारो कार्यकर्ते या रँलीत सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here