जन्मठेप ही ‘मरेपर्यंत’ नसल्याचा पप्पू कलानीच्या कुटुंबाचा आरोप

0
78

मुंबई प्रतिनिधी: खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एकेकाळचा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कलानी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण त्याला सुनावण्यात
आलेली जन्मठेप ही ‘मरेपर्यंत’ असल्याचा कुठलाही उल्लेख उच्च न्यायालयाच्या आदेशा
त नसल्याचा दावा कलानीच्या वकिलांनी केला आहे.

पप्पू कलानी हा उल्हासनगरमधील इंदर भटीजा हत्याप्रकरणात कारागृहात असून आत्तापर्यंत त्याने साडेतेरा वर्ष शिक्षा भोगली आहे. कैद्याची कारागृहात चांगली वागणूक असल्यास 14 वर्षांच्या पुढची शिक्षा माफ करण्याची तरतूद असून त्यानुसार पप्पू कलानीने येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांकडे याबाबतचा अर्ज केला होता. मात्र त्याची शिक्षा ही ‘मरेपर्यंत’ जन्मठेपेची असल्याचं सांगत मृत इंदर भटीजा यांचा भाऊ कमल भटीजा यांनी यावर हरकत घेतली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here