अँड.आंबेडकर – शिंदेची सोलापूरात भेट

0
119

सोलापूर : अँड. बाळासाहेब आंबेडकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अचानक भेट घडून आली. या बद्दलचे फोटो सध्या सोशल मीडियावरती चर्चेचा विषय बनला आहे. बाळासाहेब आंबेडकर हे नगरसेवक आनंद चंदनशिवे व बाळासाहेब वाघमारे यांच्या सोबत हॉटेल सरोवर येथे नाश्ता करण्यासाठी गेले होते. त्याच ठिकाणी सुशीलकुमार शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यास गेले होते. आंबेडकरही त्याच हॉटेलमध्ये असल्याचे कळल्यानंतर शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या, पण कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही भेट फक्त काही मिनिटांचीच होती. पण भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये काही काळ संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here