गप्पा रंगू लागल्या चौकाचौकात, नेत्याचा जीव टांगणीला ;निवडणुकीची चर्चा गल्लोगल्ली

0
126

नितीन बोटे /गारगोटी
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे वातावरण दिवसेंदिवस जोरात सुरू झाले आहे.खेडोपाडी,गावोगावी पारावर ,चौकात गप्पाचे फड रंगू लागले आहेत.कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्वादी कॉग्रेस आघाडी ,शिवसेना भाजप युती ,वंचित बहुजन आघाडी यामध्ये ही लढत होत आहे .कोण किती मते घेणार?,कोणाची विकेट पडणार?,कोण कोणाची गेम करणार ?अशा विविध प्रश्नाचं गुऱ्हाळ सध्या पारावर ,चौकात गप्पामध्ये सुरू झाले आहे.
राष्ट्वादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मोठे भगदाड पाडन्यात यश मिळवले आहे.अगदी ग्रामपंचायत पासून पंचायत समिती ,जिल्हापरिषद, महानगरपालिका ,नगरपालिका सर्वच निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे .लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात राजकारणाचे वारे जोरात वाहू लागले आहे.प्रचाराचा धुरळा उडू लागलेला आहे कोपरा सभा,प्रचार सभा,बैठका आदींवर
प्रत्येक उमेदवार व त्यांचे शिलेदार भर देताना दिसत आहेत.

जिल्ह्यात शिवसेना ,भाजप,राष्ट्वादी कॉग्रेस ,कॉग्रेस चे नेते प्रचारात उतरले असून ही लढाई जिकण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून यंत्रणा गतिमान केली जात आहे. राष्ट्वादीचे उमेदवार धनंजय महाडिक जिकणार की यावेळी संजय मंडलिक विजयी होणार ,मुन्ना च्या विरोधात बंटी जोरदार फिल्डींग लावणार अशा ना ना प्रकारच्या गप्पा पारावर ,क
चौकात ऐकायला मिळत आहेत.

कोल्हापूर च्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.,मुन्ना बंटी च्या भांडणात संजय जिकणार का ?अशी चर्चा कोल्हापुरी सुरू झाली आहे.ही लढत अटीतटीची झाली असून या लढतीत बाजी कोण मारणार अशा प्रकारच्या गप्पाचे फड रंगू लागले आहेत.नेते मात्र संपूर्ण जिल्ह्यात सावध पवित्रा घेताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here