शाळेस देणगी देऊन पार पाडले दिवसकार्य, देऊळवाडीतील संदीप पाटील यांचा पुरोगामी आदर्श विचार

0
206

गारगोटी -प्रतिनिधी

दिवसकार्य विधीच्या निमित्ताने होणाऱ्या पारंपरिक गोष्टी टाळून उपस्थित पै पाहुणे व ग्रामस्थांच्या साक्षीने एक विधायक विचार म्हणून विद्या मंदिर देऊळवाडी शाळेस देणगी वाटण्याचा कौतुकास्पद उपक्रम भुदरगड तालूका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या परिवाराने राबवुन एक पुरोगामी विचार जोपासला अाहे.
देऊळवाडी (ता.भुदरगड) येथील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते मधुकर तुकाराम पाटील यांचे ३० मार्च २०१९ रोजी निधन झाले.रक्षा विसर्जन दिवशी पाच मुठी रक्षा नदीला विसर्जित करून सर्व रक्षा झाडांना घातली. व एक पर्यावरण प्रेमी विचार जोपासला. काल त्यांचा दिवसकार्य विधी झाला. यानिमित्ताने पंचक्रोशीतील पै-पाहुणे, आप्तेष्ट व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वेळी पाटील परिवाराने नेहमीच्या प्रथा-परंपरा बाजूला ठेवल्या.व विद्या मंदिर देऊळवाडी शाळेला ५५५१/- रुपये देणगी देणगी दिली.शाळेस देणगी वाटप करण्याचा हा एक नवीन विचार व वेगळा उपक्रम अाहे.गेल्याच आठवड्यात याच गावांतील उत्तम पाटील यांनी अश्याप्रकारे शाळेस देणगी देऊन आदर्श ठेवला होता.तोच विचार संदीप पाटील यांनी जोपासल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here