शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे: विनोद तावडे

0
61

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पवारांच्या एका मुलाखतीचा दाखला देत विनोद तावडेंनी हा सवाल उपस्थित केला.

शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते, 2004 मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले नव्हते. कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन सिंग त्यावेळी राज्यसभेत होते त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले, या पवारांच्या विधानाचा संदर्भ देऊन तावडे म्हणाले की, “यंदा शरद पवार निवडणूक लढवित नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे, ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीत बोलून दाखविली असावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here