उर्मिला मातोंडकर यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

0
142

मुंबई:
उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आणि प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उर्मिला मातोंडकर विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यातच महाआघाडीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही मातोंडकर यांनी भेट घेतली. पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांची भेट झाली. पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. राजकीय परिस्थितीबद्दल दोघांनी चर्चा केल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here