कोल्हापूरच्या सातबारावर खासदार धनंजय महाडिक यांचंच नाव कायम – प्रवीणसिंह पाटील यांचं प्रतिपादन

0
110

मूरगुड:
कागल तालुक्यातील मुरगुड इथं खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ नुकताच मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार हसन मुश्रीफ, प्रवीणसिंह पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रा. जालंदर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोधकांवर सडकून टीका केली .पाच वर्ष कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले विरोधक आता निवडणुकीच्या तोंडावर जागे झाले आहेत पण जनता त्यांना आता कायमची झोपवेल असा घणाघात आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. यावेळी बोलताना प्रवीणसिंह पाटील म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या विकासकामांच्या बळावर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली आहे. त्यामुळे त्यांचं नाव जिल्ह्याच्या सात-बारावर कायमचं कोरलं गेलं आहे.
वारसाहक्कानं खासदार बनू पाहणाऱ्यांना इथं थारा नाही असा टोलाही प्रवीणसिंह पाटील यांनी लगावला. यावेळी रणजीत सुर्यवंशी,शामराव पाटील, शामराव घाटगे, आर व्ही पाटील, एम एस पाटील, नारायण ढोले,तानाजीराव मगदूम, दिग्विजय पाटील, वसंतराव पाटील, शिवाजीराव पाटील, अर्जुन म्हसवेकर, प्रकाश पाटील, अरुण यमगेकर यांच्यासह मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here