सोयीचे राजकारण करणाऱ्या महाडिक कंपनीला ह्या निवडणुकीत जिल्ह्यातून हद्दपार करा – नाथाजी पाटील

0
532

गारगोटी. :
सोयीच्या राजकारणासाठी पक्षनिष्ठेला तिलांजली देणाऱ्या महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करण्यासाठी भूदरगड तालुक्यातून महायूतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना भुदरगड तालुक्यातून प्रचंड मताधिक्य देऊया . असे आवाहन भाजपा भुदरगड तालुकाध्यक्ष व बाजार समिती संचालक नाथाजी पाटील यांनी केले.
महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या आदमापूर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी धैर्यशिल भोसले (सरकार ) हे होते. तर आमदार प्रकाश आबिटकर, मौनी विद्यापिठ सदस्य अलकेश कांदळकर, सचिनदादा घोरपडे हे प्रमूख उपस्थीत होते.
यावेळी बोलताना श्री पाटील पूढे म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रयत्नातून आदमापूर बाळूमामा मंदिरास ” ब” वर्ग दर्जा,वहातुक कोंडी फोडण्यासाठी उड्डानपूल , तसेच आमदारांनी सूध्दा आपल्या निधीतून विकासकामे केली आहेत .अशी कोट्टयावधी रुपयांची विकासकामे केली असून विद्यमान खासदारांनी मात्र येथे १रूपायांचा निधी दिला नाही. याचा विचार करून कालव्यांच्या माध्यमातून हीरवाईचे स्वप्न साकारणाऱ्या स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलीकांचा वारसा सांगणाऱ्या प्रा. संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी विजयी करूया…
यावेळी कल्याणराव निकम,दत्ताजी चौगले,दिलीप केणे, नामदेव चौगले,संतोष पाटील,रणजित आडके,सचिन हाळवणकर,प्रशांत पाटील,संजय भोसले,संतोष बरकाळे,रामभाऊ पाटील(भाजप शाखाध्यक्ष),विरकुमार पाटील(भाजपा युवा मोर्चा),अनिल पाटील,प्रविण पाटील,सुरेश सुतार, लखन लोहार, संजय पाटील, एम.डी. पाटील, शामराव पाटील, बाळू कागलकर,राजेंद्र कांबळे, भिकाजी पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते. स्वागत रामचंद्र पाटील यांनी केले तर आभार एस.जी. पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here