अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल

0
467

रत्नागिरी :-हातखंबा एस. एस. टी पॉईंट येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या चेकपोस्टवर गाडीची पोलिसांकडून तपासणी करीत असताना अश्लील भाषेत शिवीगाळ व आरडओरडा करीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची धमकी देत शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी स्वाभिमानचे सोबत असणाऱ्या १६ जणांवर ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचवेळी शिवसेना पक्षाचे जिल्हापरिषद सदस्य बाबू म्हाप यांना देखील निलेश राणे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली व मारण्याच्या उद्देशाने साथीदारांसह म्हाप यांच्या अंगावर धावून गेले. सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा धोका निर्माण झाल्याने व राणेंसह इतरांस पोलिसांनी निघून जाण्याचा निर्देश देऊनही त्याच ठिकाणी थांबून असभ्य वर्तन केले म्हणून पोलिसांनी निलेश राणे यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. हि घटना काल रात्री १२ च्या सुमारास घडली असून या घटनेचे सर्व चित्रण व्हिडीओ कॅमेरात करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. स्वाभिमानचे उमेदवार निलेश राणे यांची गाडी या चेकपोस्ट वर तपासत असताना वादावादीला सुरुवात झाली. या चेकपोस्ट वर गर्दी का आहे हे पाहण्यासाठी थांबलेल्या बाबू म्हाप यांना देखील निलेश राणे यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here