संजय मंडलिक यांना माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा, भुदरगड मध्ये राजकीय उलथापालधी

0
1079

गारगोटी -प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीत भुदरगड तालुक्यातून माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा कोणाला यावर मीडिया मध्ये वारंवार बातम्या येत होत्या आज माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव यांनी गारगोटी येथील गणेश भवन मंगल कार्यालय येथे आपल्या गटाचा मेळावा घेऊन शक्ती प्रदशन करत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठींबा दिला.

सत्यजितदादा जाधव बोलताना म्हणाले राधानगरी मतदार संघामध्ये गेल्या 50 वर्षात राजकारणात नाव असलेल्या दिनकरराव जाधवच्या हा गट आहे.दिनकरराव जाधवाच्या दरबारात सर्वसामान्य लोकांना न्याय मिळतोय. मंडलिक साहेबांचे व दिनकरराव जाधव याचे नाते गेली 25 वर्षाच आहे.
धनंजय महाडिक यांच्या विषयी बोलताना म्हणाले गोकुळ तिकीट फिक्स असताना धनंजय महाडिक म्हणाले सत्यजितदादा मला चालत नाहीत.वारंवार आम्हाला डावलले आहे.आम्ही संजय मंडलिक यांना जाहीर पाठींबा दिला आहे पण आपण येथून पुढे आमच काम करू नका पण आमच्या आडवं मात्र येऊ नका असे बोलले.संजय दादा मंडलिक यांना निवडून देण्याचे आस्वासन सत्यजितदादा जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिले या राधनगरीतून उंचाकी मतदान देण्याचे जाहीर केले.

संजय मंडलिक मेळाव्यात बोलताना म्हणाले दिनकरराव जाधव गटाने सातत्याने त्यागाची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात वारंवार चर्चा होती ती दिनकरराव जाधव गटाचा पाठींबा कोणाला ती आज मला पाठींबा देऊन त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे .पाठींबा मलाच मिळणार याची मला खात्री होती.पराभवाने माणूस खूप काही शिकत असतो .मागच्या पराभवाने मी जोमात कामाला लागलो आहे असे ते बोलताना म्हणाले . ज्यांना संधी दिली त्यांनी ती 5 वर्षात वाया घालवली आहे.
ससदरत्न पुरस्कार हा खाजगी एजन्सी चा आहे असा आरोप केला .आपल्या विभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा निवडून आल्यावर प्रामाणिक प्रयत्न करेन असे आस्वासन त्यांनी दिले.
यावेळी माजी उपसभापती सत्यजितदादा जाधव,विश्वजित जाधव ,जी प सदस्या सौ.स्वरूपारणी सत्यजित जाधव,शहाजी देसाई (वेगरुळ),प्रकाश पाटील ,रावजी पाटील,निवृत्ती पाटील(शेळप),शामराव भांदिगरे(आपाचीवडी),महादेव शेळके, अंकुश तानवडे (माद्याल),संजय होडगे(मासुरली),संजय माने (पारदेवाडी),दिलीप इंगळे, मोहन शिंदे,राजू काझी (गारगोटी),बाबुराव चेदगे(धनगरवाडा),बाळू काका चोगले (लाटगाव),संजय शिंदे(खेडे),एकनाथ वरडेकर(तळकरवाडी),बाबुराव होडगे(हाजगोळी),नारायण चव्हाण,महेश चंदनवणे(आजरा),सर्जेराव देसाई,प्रभाकर देसाई(पेरणोली),भास्कर निकम(हाजगोळी),तुकाराम पाटील,रामचंद्र पाटील,गोविद पाटील(घागरवाडी),केशव दळवी( मेरेवाडी)प्रतापसिह देसाई(देवकडगाव) याच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रास्तविक शहाजी देसाई तरआभार एकनाथ वरडेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here