जोतिबा यात्रेत सहजसेवा ट्रस्टच्या वतीने दोन लाख भाविकांना अन्नछत्राची सोय

0
234

कोल्हापूर:
गेली आठरा वर्षे जोतिबा यात्रेकरूंसाठी सहजसेवा अन्नछत्राची सेवा देत आहे. या वर्षीही दिनांक १७ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत हा उपक्रम राबवला जाणार आहे. अशि माहिती सहजसेवा ट्रस्टचे पदाधिकारी चिंतन शहा यांनी प्रेस क्लब कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते म्हणाले अठरा वर्षापूर्वी काही मित्रमंडळीनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरु केला. या वर्षी किमान दोन लाख भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावेळी १५ हजार चौरस फूटचा मांडव घालण्यात येणार आहे. स्वच्छतेला आम्ही नेहमीच प्राधान्य दिल आहे यासाठी ४० ते ५० कामगार हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवत आहेत तसेच ४०० स्वयंसेवी कार्यकर्ते अखंड चार दिवस असणार आहेत. या बरोबरच तेथे रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे, अंदाजे चार दिवसात ५०० युनिट रक्तदान होते.
यावेळी सहजसेवा ट्रस्टचे रोहित गायकवाड, चिंतन शहा, संकेत पाटील, प्रकाश केसरकर, गोविंद गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here