शाहु स्मारक मध्ये होणार ‘रमाई’ चित्रपटाचा प्रीमियर शो

0
161

कोल्हापूर:
निर्मिती विचारमंच आणि डी.जी.राजहंस मेमोरियल फौंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त माता रमाई यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘रमाई’ चित्रपटाचा प्रीमियर शो गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी सायं. ५ वा. शाहू स्मारक, दसरा चौक येथे आयोजित केला आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते चंद्रकांत खरात यांनी प्रेस क्लब कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी ते म्हणाले, माता रमाई यांचा त्याग, बलिदान याची शिकवण या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळेल. बाबासाहेबांच्या सारख्या क्रांतिसूर्याच्या पाठीशी त्या हलाखीच्या परिस्थितीत भक्कमपणे उभ्या राहिल्या. त्या सत्वशिल, त्यागी आणि समाजशील विचारांच्या होत्या. अशा संघर्षमय, कर्तुत्ववान, आधुनिक समाजाला प्रेरणादायी अशा माता रमाई यांच्यावर आधारित एखादी कलाकृती सिनेमाच्या रुपात येत असेल तर तिचे स्वागत आपण सर्वांनी केल पाहिजे. ११ एप्रिलच्या या प्रीमियर शोसाठी चित्रपटातील कलाकार विणा जामकर, सागर तळाशीकर, अरुण नलवडे, स्वप्नील राजशेखर, प्रफुल्ल सामंत, प्रकाश धोत्रे यांच्या सह दिग्दर्शक बाळ बरगाले, निर्माते प्रा. प्रगती खरात, मनीष मोटे, चंद्रकांत खरात, कथा लेखक – डॉ. अरुण मिरजकर, गीतकार प्रा. भीमराव धुळबुळू,प्रा. गोपाळ कबनुरकर, संगीतकार मधु-क्रुष्णा यांच्यासह गायक आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रवींद्र साठे, विजय सरतापे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी अनिल म्हमाने, प्रा. कपिल राजहंस, प्रियाताई कांबळे,शेखरभाऊ संदे, राहुल राजहंस, नीलेश बनसोडे, संभाजी कांबळे, डॉ.दयानंद ठाणेकर, नाना भोसले, अँड. सरदार कीर्वेकर, सुरेश केसरकर, कबीर नाईकनवरे, भंते आर.आनंद, भंते संबोधी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here