सेक अकॅडमी तर्फे अंध मुलांना फुटबॉल प्रशिक्षण

0
98

कोल्हापूर:
कोल्हापूरातील बुधवार पेठेतील सॉकर एज्युकेशन & कॉर्पोरेट (सेक)अकॅडमीच्या वतीने राजोपाध्ये नगर येथील अंध मुलांसाठी फुटबॉल शिबीर आयोजित केले गेले. दिनांक 4एप्रिल ते 6 एप्रिल या कालावधीत अंध मुलांसाठी फुटबॉल विषयी प्राथमिक माहिती, आहारविषयक मार्गदर्शन, तसेच अंध मुलांच्या फुटबॉल स्पर्धेबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित खेळाडूंना अकॅडमी चे टी-शर्ट,व फुटबॉल साहित्य देण्यात आले.अंध मुलेही फुटबॉल खेळतात हे समाजाला दाखविण्यात आले. भविष्यात अंधमुलांचा संघ तयार करण्याचा सेक अकॅडमी चा निर्धार आहे.
राजारामपुरी पोलिस स्टेशनचे श्री चेतन घाटगे (सर) ,सेक अकॅडमी अध्यक्ष व प्रशिक्षक श्री.अनिल अडसुळे ,श्री.शुभम गुरव,श्री.दिग्विजय सुतार,ओंकार लायकर ,शाळेचे संचालक मा.श्री.अजय वनकुद्रे सर ,संजय ढेंगे सर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here