आता दुसरा मोदी तयार होवू नये याची काळजी घेतोय – शरद पवार

0
316

बारामती:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आल्याचं विधान कधीकाळी केले होते, मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदी पवारांवर टोकाची टीका करत आहेत, या पार्श्वभूमीवर आपण आता दुसरा मोदी तयार होवू नये याची काळजी घेत असून, माझ बोट कोणाला धरू देत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी दौंडमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

एकदा नरेंद्र मोदी बारामतीला आले होते, यावेळी बोलताना त्यांनी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो असं सांगितले होते, ते तसं म्हणल्यावर मला बोटाची भयंकर चिंता वाटत आहे, फक्त बोट धरल की माणूस एवढा बदलतो, तर हात धरल्यावर काय होईल. त्यामुळे आता संसदेत भेटलो की त्यांनी हात पुढे केल्यावर मी नमस्कार करून मागे होतो. अशी मिश्कील टीका पवारांनी केली आहे.

दरम्यान, राजकारणात वैयक्तिक टीका करू नये असा निमत आहे, परंतु वर्ध्याच्या सभेत वर्ध्याच्या सभेत मोदींनी माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे असल्याचं ते म्हणाले. आता भेटल्यावर त्यांना मी विचारेल. अस देखील पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here