किशोर वय म्हणजे बालपणातून तारुण्यात जाणारे वय- डॉ .शर्मिला बलुगडे

0
108

गारगोटी-प्रतिनिधी
किशाेर वय म्हणजे बालपणातून अलगत तारुण्याकडे जाणारे वय शारीरिक वाढीबरोबरच मेंदूत विचारांचे भावनांचे उमटणारे असंख्य सौम्य तरंग .मात्र ही किशोरी अवस्था आपण समजतो का साधारण नव्याच्या वर्षांनंतर मुलींच्या शरीरात नैसर्गिक बदल हाेत असताे व ताे किशोरवयात लपवुन ठेवला जाताे . त्यामुळे मुलींना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते . असे प्रतिपादन डॉ. सौ शर्मिला बलुगडे यांनी केले . बिद्री (कागल) येथील भारतमाता हायस्कूल बिद्री येथे किशोरवयीन मुलींच्या समस्या व मार्गदर्शन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पदावरुन बोलत होत्या .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा साै जी. ए. डिगरे होत्या. सुरुवातीला शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
त्या पुढे म्हणाल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सुरक्षितेसाठी किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक असते . अशा वेळी आईने आपल्या मुलीची मैत्रीण बनावे. तिला विश्वासात घेऊन शारीरिक बदलावीशी माहिती द्यावी . शारीरिक व मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन केले पाहीजे . शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना नेमकी काय काळजी घ्यायची य‍ाविषयी किशाेरवयीन मुलींमध्ये अनभिज्ञता दिसुन येते. या विद्यार्थ्यांना किशाेर वयाबाबतचे शास्त्रीय ज्ञान व आरोग्यविषयक माहिती असणे आवश्यक आहे . हे जर ज्ञान मुलींमध्ये आले तर मुलींमध्ये निर्माण होणारे गैरसमज ,किशोरवयातील शारीरिक मानसिक बदल , योग्य आहार, आरोग्याशी निगडीत समस्या मुलींना कधीच उद्भवणार नाहीत असे व्यक्त केले . यावेळी बाेरवडे केंद्राच्या आरोग्यसेविका साै.आर एम शिंदे , मुख्याध्यापक पी व्ही पाटील , विद्यार्थिनी उपस्थित होत्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here