तीन राज्यात 50 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, कमलनाथांचे ओएसडी निशाण्यावर

0
154

दिल्ली:
आगामी लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आयकर विभागाने देशातील तीन राज्यात ठिकठिकांनी धाडी टाकून मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव (ओएसडी) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला असून जवळपास 15 अधिकारी त्यांच्या घराची अद्याप झडती घेत आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कड यांच्या जयनगरमधील घरावर रात्री तीन वाजताच्या सुमारास आयकर विभागाने छापा टाकला. दरम्यान, प्रवीण कक्कड यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. प्रवीण कक्कड यांच्याशिवाय कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
आयकर विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या आयकर विभागाने तब्बल 50 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापासून सुरू असलेली ही कारवाई अद्याप सुरूच आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी प्रवीण कक्कर यांच्यासह राहुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळशिवाय गोवा आणि दिल्लीतील 35 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या देशभरातील कारवाईसाठी तब्बल 300 आयकर आधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here