धनंजय महाडिक यांना पुन्हा लोकसभेत पाठवणार -बिद्री संचालक धनाजीराव देसाई

0
234

गारगोटी -प्रतिनिधी
ज्या कर्जमाफीचा लाभ देशभरातल्या शेतकऱ्यांना झाला. त्या कर्जमाफी पासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मात्र वंचित राहिला. जिल्ह्याला माहीत आहे.अशा भूलथापा देणाऱ्या लोकांना शेतकऱ्यांची मतं मागण्याचा अधिकार नाही असे उदगार बिद्री कारखाना संचालक धनाजीराव देसाई यांनी नितवडे (भुदरगड) येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारा दौऱ्या प्रसंगी काढले .
ते पुढे म्हणाले खासदार धनंजय महाडिक यांचे लोकसभेत प्रतिनिधित्व करत असूनही आपल्या कामगिरीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.आणि त्यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित केले.संसदेतअनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी संसदेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सरकारलाही दखल घ्यावी लागली, त्यांचं हे कार्य पश्चिम महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करावं असे आवाहन देसाई यांनी केले माजी आ.के.पी म्हणाले हे सरकार शेतकरी विरुद्ध आहे.या सरकारला सतेतून बाजूला करणे गरजेचे आहे.केवळ भूलथापा देण्यापलीकडे यांनी काय केले नाही शेतकऱ्यांच्या खात्यात १५पैशे जमा झाले नाहीत,महागाई कमी नाही,बेकारी कमी झाली नाही,राफेल विमान घोटाळा,राज्यातील १४मंत्री भ्रष्टाचार आतापर्यत कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे.आमच्या काळात २/३रुपयेला गोर-गरिबांना मिळणारा गहू-तांदूळ आता थम जुळत नसल्याने लाभार्थी रानोमाळ फिरत आहेत . प्रत्येकवेळी नवनवीन नियमामुळे हे सरकार लोकशाही टीकवणारे नसल्याने समाजातील सर्वच घटकांमध्ये भाजप सरकारबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. ही चीड मतपेटीतून व्यक्त करुया आणि फसव्या सरकारला घरी बसवूया. खासदार धनंजय महाडिक म्हणाले संसदेत आपण जी कामगिरी केली त्या पाठीमागे कोल्हापूरच्या जनतेचा आशीर्वाद आणि खासदार शरद पवार साहेब यांचे पाठबळ आहे. गत लोकसभा निवडणुकीत माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला आपण निवडून दिलात त्यामुळे मी संसद रत्न पुरस्कार प्राप्त केला मला माझे काम सांगण्याची गरज नाही मी जिथे जाईन तिथे माझ्या कामाची शिदोरी घेऊनच फिरतो. मंडलिक यांच्या घरी पंचवीस वर्षे खासदार की होती पण त्यांची सत्तेची हाव संपलेली नाही . गेली पाच वर्षे ते कोठे होते हे कोणालाच माहीत नाही.आता ते मते मागण्यास फिरत आहेत .पहिलेे त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे मग मते मागावीत असे उदगार महाडीक यांंनी काढले . महाडिक नेहमी समाजाचे चांगलेच करत असतात. माझ्या कामाची पद्धत आपण आपल्या पै-पाहुण्यांना नातेेेवाईकांंना सांगा की मला आपल्या मदतीची गरज आहे असे आवाहन त्यांनी दौऱ्याप्रसंगी केले
यावेळी गोकुळ संचालक धैर्यशील देसाई, विलास कांबळे,बिद्री संचालक के.ना.पाटील. उत्तम पाटील,बाळासो भालेकर, ,राजाराम पाटील,राजू पार्टे, धनाजी तरवडेकर, आनंदा वड्ड, यशवंत मुळीक,गोविंद भुतल आदी कार्यकर्ते उपस्थित होते आभार शिवाजी पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here