मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली ,निवडणूक आयोगाने घेतला निर्णय

0
106

दिल्ली:
व्हीव्हीपॅट मशीनवर एका मतदानासाठी लागणारा सहा सेकंदांचा वेळ आणि उन्हाळ्याचा विचार करता मतदानाची वेळ वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सकाळी सात वाजता प्रारंभ केला जाईल, तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. पूर्वीच्या तुलनेत दीड तासाने मतदानाची वेळ वाढली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीलेश श्रींगी यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून ‘ईव्हीएम’ हॅकिंगसह त्यामध्ये छेडछाड केल्याच्या अनेक तक्रारी राजकीय पक्षांसह नागरिकांनी केल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करणे शक्य नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ईव्हीएमबद्दल निर्माण झालेल्या साशंकतेच्या वातावरणामुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीपासून ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा अवलंब केला जाणार आहे. मतदान केल्यानंतर मतदाराने मत दिलेल्या उमेदवारालाच मत मिळाल्याची खात्री व्हावी, यासाठी एक चिट्टी दिसण्याची व्यवस्था व्हीव्हीपॅट मशीनमध्ये करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एका मतदानासाठी सहा सेकंदांचा वेळ लागणार आहे. मतदारांची वाढलेली संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनवर लागणारा वेळ लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतदानासाठी दीड तासाचा वेळ वाढवून दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here