सत्ताधारी शासनास सत्तेचा माज उतरवण्यासाठी देशात एकत्रित:खा. राजू शेट्टी

0
235

हेरले / प्रतिनिधी दि. ३/४/१९

सत्ताधारी शासनास सत्तेचा माज आला आहे. हा सत्तेचा माज उतरविण्यासाठी देशात आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहोत. घटना देशाचा आत्मा आहे, घटनेला नख लावायला चालल्यात ते चालू देणार नाही. संयमाचा बांध फुटला असून तुम्हाला पायाखाली घेणार असा सत्ताधाऱ्यावर घणाघात खास. राजू शेट्टी यांना घातला.
ते हेरले ( ता. हातकणंगले) येथे १७ व्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदार सघाचे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय कॉग्रेस ,राष्ट्रवादी कॉग्रेस व मित्रपक्ष यांची संयुक्त आघाडी प्रचारार्थ जंगी जाहीर सभेप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच अविश्वनी चौगुले होत्या.
खास. शेट्टी पुढे म्हणाले, जनता वर्गणी काढून मला निधी जोपर्यंत दिईल तो पर्यंत मी निवडणूक लढवित राहणार आहे. वर्गणी बंद झाली की निवडणूक लढणार नाही.आमच्यातील एक भामट दुसरीकडे गेलय ते या झेंड्याला फडक म्हणत फिरत आहे तर वर्गणी निधीस डब्याची उपमा देऊन चेष्टा करतय. शेतकरी याच फडक्यातून शेतात शिदोरी घेऊन जातो. मला शेतकरी वर्गणी देतो. म्हणून हात पसरावे लागत नाही. त्यामुळे आमच्या मिशीस खरकट लागल नाही.
लुंग्या सुंग्याने माझ्यावर आरोप केले आहेत.बिंदू चौकात एकदाचे होऊन जाऊंदया!माझ्यावर पैसे घेतलेचे आरोप होत आहेत. ज्यांच्याकडून घेतले त्यातील एखादा तरी पुढे आणावा असे आवाहन करतो. शंभर ते सव्वाशे साखर सम्राटांनी पक्षातंर केले आहे.तुम्ही कुठ कुठ ज्यांच्याकडून खाल्ल आहे ते सगळे सांगणारी माझ्याकडे आहेत. दादा तुम्हच्या सोयीने तारीख ठरवा आम्ही तयार आहोत.
काल वेगळी माणसे विरोधात आज वेगळी माणसे विरोधात आहेत. संघर्ष पाचवीला पुजलेला आहे त्यामुळे माझी तक्रार नाही. सरकार कोणाचेही असो शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा संघर्ष राहणार. भ्रष्टाचार , घोटाळे यांच्या विरोधात सदैव राहणार. छप्पन्न इंच छातीचे जवान शेतकरी कष्टकरी कुटुंबातीलच आहेत. ते देशाचे संरक्षण करतात. सिमेवर लढतांना शहीद झालेल्या जवानांना शहीदाचा दर्जा दिला जावा. महात्मा गांधी यांच्या पाठीशी खेडयातीलच लोक होते. त्यामुळे स्वातंत्र्य संग्राम यशस्वी झाला. त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महाआघाडीच्या पाठीशीच राहणार.
राजूबाबा आवळे म्हणाले देशात उदयोजक धार्जीन सरकार आल्याने गोरगरीब जनतेचे हाल होत आहे. नोटबंदी जीएसटी यामुळे सर्वसामान्य जनतेचे जिणे मुश्किल झाले आहे. माजी सभापती राजेश पाटील म्हणाले बहुरूप्याचा २०१७च्या निवडणूकीत आम्ही कार्यक्रम केला आहे, याही निवडणूकीत बहू रूप्याचा कार्यक्रम करून त्याची जागा दाखवून देऊ.
स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालधंर पाटील म्हणाले, खास. राजू शेट्टीमुळेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. २oo२ ते २०१९ या १७ वर्षात शेतकऱ्यांच्या ऊसास योग्य भाव त्यांनी मिळवून दिल्याने शेतकऱ्यांच्या ह्रदयात त्यांचे कार्य बिंबले आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहावे आणि त्यांची हॅट्रीक साधावी.
यावेळी जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील राहुल शेटे, भाऊसाहेब कस्बे, आप्पासाहेब एडके, वैभव कांबळे, डॉ. सनथकुमार खोत, संदीप चौगुले, मुनीर जमादार, आदगोंडा पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष भगवान काटे,राजेंद्र गडयानवार, सावकार मादनाईक, भगवान जाधव, माजी सभापती जयश्री कुरणे, बादशहा देसाई,रियाज जमादार, अभिनंदन करके, डॉ. विजय गोरड, लक्ष्मण निंबाळकर, अल्लाउद्दीन खतीब, आदी मान्यवरांसह शेतकरी , ग्रामस्थ मोठ्या संख्येंनी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदिप चौगुले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here