निवडणुकीत सक्रिय सहभाग न घेणाऱ्यावर कडक करवाई : पी.एन.पाटील

0
903

कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये कॉंग्रेस पक्षातील सर्व नेत्यांसहा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अन्यथा कडक करवाई करण्यात येईल. असा सज्जड दम राष्ट्रीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष पी.एन.पाटील यांनी दिला, ते कोल्हापूर मध्ये आयोजित कॉंग्रेस कमेटीच्या बैठकीत बोलत होते. पुढे ते म्हणाले, एकमेकांचे मावळा-कावळा करणारे एकत्र येत आहेत. हुकूमशाहीला हरवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे. जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, भाजपने गेल्या पाच वर्षात पोकळ घोषणा केल्या. नोटाबंदीच्या काळात महिलांचे हाल सर्वात जास्त झाले. हे मनूवादी सरकारला पायउतार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे, ही वेळ एकमेकांना फसवण्याची नाही. तरुणवर्ग आपल्या पाठीशी आहे, ती ताकत आपण दाखवून देऊ. माजी खा. जयवंत आवळे म्हणाले, या लोकसभेमध्ये देशाचे भवितव्य ठरणार आहे तरी आमचाही झेंडा तुमच्या हाती असावा, असा टोला मित्र पक्षास जयवंतराव आवळेंनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here