हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एका उमेदवाराने भरली चक्क २५ हजाराची चिल्लर अनामत रक्कम

0
499

कोल्हापूर प्रतिनिधी : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग उमेदवार किशोर राजाराम पन्हाळकर (अपक्ष )उमेदवार रा.पेठवडगाव यांनी चक्क २५ हजार अनामत रक्कम चिल्लर स्वरुपात भरली,अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी दिली.
ते म्हणाले, पन्हाळकर या उमेदवाराने आणलेली अनामत रक्कम चिल्लर या स्वरुपात असल्याने पाच ते सात जणांची मोजण्यासाठी नियुक्ती करण्यात आली.ती रक्कम साडे सतरा हजाराची १०,५,२,१ रुपयाची नाणी होती, साडे सात हजारांच्या १०,२० ५० रुपयांच्या नोटा होत्या.यामध्ये दहा रुपयांच्या नोटा जास्त होत्या.ही रक्कम मोजण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागला.अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी काटकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here