महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे:पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
199

वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ध्यातून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. वर्ध्याच्या स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावरील या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली. शरद पवारांनी मतदानापूर्वीत मैदानातून पळ काढल्याचा टोला मोदींनी लगावला. तसंच पवारांच्या घरी गृहयुद्ध सुरु असल्याचंही ते म्हणाले.या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातले भाजप आणि मित्रपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here