कोल्हापूरात “मैं भी चौकीदार कार्यक्रम” हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थित संपन्न.

0
367

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुचर्चित “मैं भी चौकीदार” हा कार्यक्रम दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये उत्साहात पार पडला. यावेळी देशभरातील 500 पेक्षा जास्त ठिकाणाहून लाईव्ह वीडियो कॉन्फरन्स व्दारे जनतेशी संवाद साधला. कोल्हापूर मध्ये जयलक्ष्मी हॉल येथे हा कार्यक्रम मोठ्या स्क्रीन वर लाईव्ह पाहण्याची सोय केली होती. यावेळी शहरातील भाजपचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात मोदी यांनी देशातील तरुण वर्गाला आकर्षित करतील अश्या मुद्यावर अधिक भर दिलेला दिसून आला. भ्रष्टाचार या मुद्यावर ते म्हणाले की, आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना पै-पै परत करवी लागणार. सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक चे यशाचे खरे मानकरी मी नसून भारतीय सैन्य आहे. कर्याक्रमाची सांगता करतांना संजय मंडलिक यांनी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीतील स्टेडीयम मध्ये स्वता हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here