ऐन निवडणूकीत नगर ,सोलापूरात रोकड जप्त

0
168

सोलापूर : ऐन निवडणुकीच्या काळात अहमदनगर आणि सोलापुरातून जवळपास एक कोटींहून अधिकची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरात तब्बल 84 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. अहमदनगर शहरातील वैदूवाडी परिसरात रिक्षातून 84 लाख रुपये येत असल्याची गुप्त माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. आयकर विभागाचे पथक देखील घटनास्थळी पोहोचले असून ही सर्व रक्कम आयकर विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एवढी रक्कम कुठून आली याचा तपास आता आयकर विभाग करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here