प्रियांका-निक घटस्फोट घेण्याच्या तयारीत?

0
677

न्यूयॉर्क : बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले. सोशल मीडियावर ही जोडी सतत चर्चेत असते. पण लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच हे दोघं विभक्त होणार असल्याचं वृत्त आहे. प्रियांका-निक घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त एका आंतरराष्ट्रीय वेबसाइटने दिलं आहे. ‘प्रियांका आणि निकने घाईगडबडीत निर्णय घेऊन लग्न केलं पण त्याची किंमत आता ते मोजत आहेत. या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले आहेत. प्रियांकाचा तापट स्वभाव हे मुख्य कारण आहे. निकसोबत आता जोनास कुटुंबीयांनाही प्रियांकाचं वागणं खटकू लागलं आहे, ’ असं ‘ओके’ वेबसाइटच्या वृत्तात म्हटलं आहे. दुसरीकडे या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्टीकरणं प्रियांकाच्या टीमनं दिलं आहे. घटस्फोटाचं वृत्त पूर्णपणे चुकीचं असून प्रियांका-निकबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचा हा प्रयत्न आहे, असं तिच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here