संजय मंडलिक यांच्या विजयासाठी भाजप भुदरगड तालुक्याचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील -तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील

0
346

गारगोटी -प्रतिनिधी

पालकमंत्री नाम. चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा -शिवसेना युतीचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी भाजपा चे भूदरगड तालुक्यातील कार्यकर्ते जीवाचे रान करतील असे प्रतिपादन भाजपाचे भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले. प्रा. संजय मंडलीक यांच्या भाजपाचा वतीने प्रचार नियोजन बैठकीत ते बोलत होते . अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक मा.बाबा देसाई हे होते तर. मौनी विद्यापीठ सदस्य अलकेश कांदळकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील पूढे म्हणाले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पून्हा पंतप्रधान करण्यासाठी यूतीचा एक एक उमेदवार खासदार होणे आवश्यक आहे. गतवेळच्या निवडणूकीत प्रा. संजय मंडलिक यांचा अल्प मतात पराभव झाला, गेली ५ वर्ष ही भळभळती जखम घेऊन आपण वावरलो, आता या जखमेवर उपचार करण्यासाठी या जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कंबर कसली असून त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मतदार संघातून प्रा. मंडलिक यांच्या रुपानं मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी खासदार संसदेत पाठऊया..
यावेळी,भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर,प्रा.हिंदुराव पाटील, संतोष पाटील (दारवाडकर),के.बी.देसाई,हिंदुराव झांबरे पाटील(नाधवडे), विलास बेलेकर(करडवाडी ), दिलीप केणे(व्हणगुती) ,गणपतराव शेटके,
रणजित आडके , (मिणचे खुII ), सुनिल तेली, (शेणगाव )नामदेव चौगले, (मडीलगे )रमेश रायजादे, (पडखंबे )
राहुल चौगले(शहराध्यक्ष गारगोटी .), दिपक पाटील ( कोनवडे ),विनायक देसाई(अंतुर्ली),पी.बी.खुटाळे,
सरदार शेख(अनफ बु.), (मोरेवाडी )संतोष पाटील (डेळे),बाज देसाई (कडगांव ) जयराम कांबळे (कारीवडे ) निवास देसाई, अभिजीत आसबे, दिगंबर जाधव , (टिक्केवाडी )किरण गुरव(मडुर),अशोक येलकर, (बेगवडे )सुनील पाटील(पांगिरे),आनंदा रेडेकर, आनंदा पाटील,ए. डी.कांबळे,सुशांत मगदूम हिमांशु नाईक (खानापूर),विक्रम पोवार(कलनाकवाडी), आनंदा आमते(गंगापूर),सचिन घरपणकर (आंबवणे),भिकाजी देसाई(शेळोली),संतोष बरकाळे, (वाघापूर )जोती शिंदे(बारवे),सचिन हाळवणकर,अनंत डोंगरकर(भाटीवडे),अशोक कांबळे (नवले) आदी कार्यकर्ते उपस्थीत होते .स्वागत व प्रास्ताविक प्रा. संतोष पाटील यांनी तर आभार रणजित आडके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here