हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला अजितदादा

0
239

इंदापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं आहे. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि बारामतीचे अजित पवार यांचे राजकीय हाडवैर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तरी बेहत्तर पण इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असे म्हणणारे अजित पवार चक्क हर्षवर्धन पाटील यांच्या यांच्या दारात गेले. राष्ट्रवादी जोपर्यंत विधानसभेसाठी शब्द देत नाहीत तो पर्यंत लोकसभेचे काम करायचे नाही. प्रचारात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय या भागात काँग्रेसने घेतला होता. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची चिंता वाढली होती. इंदापूर, भोर आणि पुरंदर या भागात काँग्रेसची मतं निर्णायक आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात हा भाग येत असल्याने या भागातून मतदान झालं नाही तर मताधिक्य घटण्याचा धोका सुप्रिया सुळेंना वाटत आहे. त्यामुळे अजितदादांनी ताईंसाठी धावपळ करत हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण हेही उपस्थित होते. बारामतीत यावेळी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here