राहुल आवाडेंची माघार ; खा. शेट्टींना पाठींबा

590

कोल्हापूर : जिल्हा परिषद सदस्य व माझे पुत्र राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज आणला होता. तथापी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता या निवडणुकीत त्यांचा खा. राजू शेट्टी यांना बिनशर्त पाठिंबा राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. राहुल यांच्या या भुमिकेमुळे या मतदारसंघातील बंडखोरी टळली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आघाडीत असल्याने ही भूमिका घेतली आहे. सांगली मतदार संघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे असेही त्यांनी सांगितले.