माढातून भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी

0
129

सातारा : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने आज (शुक्रवार) देशभरातील ११ उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. त्यात नाईक यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नाईक निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपात आले होते. आता त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांच्याबरोबर होईल. माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून रोज वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या. ऐनवेळी राष्ट्रवादीतून आलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळेल असे बोलले जात होते. रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे वडील विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते यांनीही भाजपाने उमेदवारी दिल्यास लढण्याची तयारी दर्शवली होती. पण अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारत उमेदवारी मिळवली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here