“मिशन शक्ती” बाबत पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करायची काय गरज :राज ठाकरे

0
304

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘मिशन शक्ती’वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ”एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शिवाय, ‘वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे, त्यांना सांगू द्या, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या’, असा टोला राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here