महावितरणच्या ग्राहकांना मीटर रिडींग घेण्याची पूर्वसूचना एसएमएसद्वारे मिळणार

0
49

मुंबई : ग्राहकांची गैरसोय होवू नये, मीटर रिडींग आणि वीजबिलात अचुकता व पारदर्शकता राहावी यासाठी महावितरणच्या ग्राहकांना आता मीटरचे रिडींग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे याची पूर्वसूचना ग्राहकांच्या महावितरणकडील नोंदणीकृत मोबाईलवर एक दिवस अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. महावितरणने ऑगस्ट 2016 पासून मोबाईल ॲपव्दारे मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठया प्रमाणात अचूकताही आली आहे. आता वीजमीटर रिडींग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटर रिडींग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटर रिडींगच्या पूवसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून यात सकाळी 8 ते 10, 10 ते 12 दुपारी 12 ते 3 आणि 3 ते 5 या दरम्यान कोणत्या वेळेत रिडींग घेतले जाणार आहे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार आहे अथवा नाही. ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल अशा ग्राहकांनी महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणार्याा कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. तसेच www.mahadiscom.in संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारेदेखील मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here