जया प्रदा भाजप प्रवेश करण्याची शक्यता

0
473

लखनऊ : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी सेलिब्रेटीना पक्षात घेण्यासाठी चंग बांधला आहे. आगामी लोकसभेसाठी भाजपने अनेक कलाकार आणि खेळाडूंना संधी दिली आहे. यातच अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या नेत्या जया प्रदा यासुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
समाजवादी पार्टीकडून 2004 आणि 2009 मध्ये खासदार झालेल्या जया प्रदा यांनी भाजप प्रवेश केल्यास त्यांना रामपूर मतदारसंघाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here