पालकमंत्र्यांना आमदारांच्या आव्हानाचा विसर , विधानसभेला एकत्र राहणार का ?

0
1769

गारगोटी -नितीन बोटे:
काही महिन्यांपूर्वीच बिद्री साखर कारखान्याची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील  व आ. प्रकाश आबिटकर यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. एकमेकांविरोधात प्रखर आणि जहाल भाषणबाजी केली. आता मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने  ना. पाटील व आ. आबिटकर हे दोघे भुदरगडच्या भूमीत गळ्यात गळे घालून, खुर्चीला खुर्ची लावून हसत हसत राजकारणाच्या गुजगोष्टी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे आता गळ्यात गळे घालताना बघून जनतेनेही कपाळाला हात लावला आहे.
आणि राजकारणात माझ्या विरोधात उभा राहून दाखवा म्हणून व्यासपीठावर शड्डू आमदार आबिटकर यांचा विसर पडला असावा कि काय?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील दादाने असाच युती धर्म पाळल्यास भाजपात प्रवेश केला आणि मी आमदार होणारच हे स्वप्न बाळगणाऱ्या
युवकांचे काय होणार हा प्रश्न मात्र युवकांना भेडसावत आहेच पण दादांचे राजकारणातील वागणं खुद्द दादांच्या खानापूर या गावात पटलेले नाही त्यामुळे दादा ज्यांना मदत करण्यास सांगितल त्यांच्या उलटे करायचे अशी चर्चाच दबक्या आवाजात आहे.
बिद्री साखर कारखान्याची निवडणूक सर्वार्थाने गाजली. हिंमत असेल तर चंद्रकांतदादांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान आ. आबिटकर यांनी प्रचारसभेत दिले होते. तर माझ्या विरोधात कोणीही निवडणूक लढवावी, त्याचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रत्युत्तर दादांनी दिले होते. इतक्या ईर्ष्येचे आणि टोकाचे राजकारण या निवडणुकीत झालं होतं.

पण राज्य पातळीवर युतीची घोषणा झाली व कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेना-भाजपतर्फे प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झाली. आणि मग सर्व चित्रच बदलून गेलं राव ! गारगोटी येथे नुकताच शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा पार पडला. या मेळाव्यात ना. पाटील व आ. आबिटकर जनतेसमोर असे काही वावरत होते की काही महिन्यांपूर्वी आपण एकमेकांवर बोचरी टीका करीत होतो, हे घडलेच नाही. त्यामुळे जनतेला तेव्हाचे दादा-आबिटकर खरे की आत्ताचे एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे खरे, हा प्रश्न पडला आहे. यातून कोण कोणाला मूर्ख बनवितंय हेच कळेनासे झालंय, हे मात्र खरं
अशी चर्चाच मतदार संघातील मतदार राजा करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here