महाआघाडीच्या पत्रकार परिषदेस विखे पाटील गैरहजर

0
83

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीची घोषणा केली. अखेर चार महिन्यांच्या कालावधीनंतर दोन्ही पक्षांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाआघाडीची घोषणा केली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार ,जितेंद्र आव्हाड तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हजर होते. महाआघाडीचे सर्व नेते हजर असताना विखे पाटलांनी मात्र, पाठ फिरवली. त्यांच्यासह मुंबईचे शहर अध्यक्ष संजय निरुपम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील अनुउपस्थित होते. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच विखेंचा मुलगा सुजय हा भाजपात दाखल झाला. राधाकृष्ण विखे सुद्धा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आपण काँग्रेसमध्येच राहणार असं स्पष्ट केलं. परंतु, शिर्डीत सेनेच्या उमेवादाचा आणि नगरमध्ये आपल्या मुलाचा प्रचार करणार असं विखेंनी सांगितल्याचं सेनेच्या नेत्याने काल दावा केला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने उमेदवारी न दिल्याने सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. ‘मला लोकांमध्ये जाऊन नशीब अजमावयाचे आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणारच,’ असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here