राज ठाकरे राष्ट्रवादीचे ‘स्टार प्रचारक’ ?

0
417

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्पष्ट केले आहे पण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील, अशी चर्चा आहे. ज्या मतदार संघात राष्ट्रवादीसमोर भाजपा- शिवसेनेचे कडवे आव्हान असेल त्या मतदार संघात राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन केले जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. तसेच राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. रंगशारदा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मोदी आणि शहामुक्त भारतासाठी भाजपाविरोधात मतदान करा, असं आवाहनही केलं होत. राज ठाकरे यांनी भाषणांमधून मोदी- शहा यांच्यावर जोरदार टीका केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here