होळीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात सोंगे काढण्याची परंपरा आजही कायम

494

गारगोटी (नितीन बोटे):
होळीचा सण म्हणजे वाईट विचारांचे निर्मूलन ,वाईट विचार जाळणे, यासाठीच प्रत्येक गावात चौकात व प्रत्येक घराच्या दारात होळी पेटवली जाते,होळीचा दुसरा दिवस धुळवड म्हणजेच धुलिवंदनाचा असतो,यादिवशी ग्रामीण भागात सोंगे काढणेची परंपरा जपली जाते,

होली पेटविलेल्या दुसऱ्या दिवशी लहान मुले तोंडाला रंग फासुन सोंगे काढून “आंधल्या पांगल्या “ची गाणी गातात, हातात टीमक्या वाजवत विविध भूमिका साकारून ही।मुले गावभर गल्लीगल्लीतुन फिरतात, धान्य पैसा गोळा करतात, आज ग्रामीण भागात लोकांना जाग आली,ती या मुलांच्या टिमकी वाजवण्यानेच, त्यामुळे आज सकाळपासूनच भुदरगड तालुक्यातील खेडेगावातून चैतन्य निर्माण झाले होते, विशेषता यामध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती.
आजही धावपळीच्या जीवनात अशी जुनी परंपरा जपण्याचे कार्य या मुलांकडून होतेय याचे कौतुक आहे.