वणव्यामुळे लागलेल्या आगीत काजू व इतर झाडे जळून लाखो रुपयांचे नुकसान , वेंगरुळ गायरानातील प्रकार

0
271

गारगोटी -प्रतिनिधी
वनविभाच्या दुर्लक्षामुळे वेंगरुळ ता.भूदरगड येथील गायरानातील काजू व इतर झाडाची बाग वणव्यामुळे लागलेल्या आगीत जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.या काजू बागेचा वेळीच लिलाव झाला असता तर सदरची हानी टाळता आली असती.असे रमेश जाधव व येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे
वेंगरुळ येथे सुमारे ५ हेकटर गायरान क्षेत्र आहे. या गायरणात वन विभागाने २० वर्षांपूर्वी काजू व अष्टमबाभुल झाडे लावली आहेत.वन विभागाकडील गायरान वन ग्रामपंचायत वेंगरुळ च्या देखरेखाली आहे. झाडे लावल्यानंतर ५ वर्षांनी काजूची झाडे मोठी होऊन काजूला बहर चालू झाला.त्यानंतर वनविभागाने काजू बागेचा लिलाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली. या पूर्वीही लिलावाची प्रक्रिया वेळेवर होत नव्हती. त्यामुळे यापूर्वी सुद्धा अनेक वेळा सदरचे गायरान वनव्यात सापडून काजूची व इतर झाडे तसेच या गायरनात असणारी करवंद, असोळी इत्यादी वनस्पती जळून खाक झाली आहेत. अधून मधून लागणाऱ्या वाव्यामुळे या गायरनात असणारी झाडे व वनस्पती सध्या कमी झाली आहेत.या गायरणात अभद्र माणसाकडून मुद्दाम वनवा लावण्याचे प्रकार ही घडले आहेत .वनवा लागू नये यासाठी संभदित वन विभागाचे अधिकारी वेळीच उपाय योजना का करत नाहीत त्यामुळे या गायरनात सतत वणवा लागण्याचे प्रकार घडत आहेत. या गायरानातील काजू काढणे लिलावासाठी ग्रामपंचायतील प्राधान्य दिले जात होते.त्यानंतर गेली दहा वर्षे तुळजाभवानी महिला बचत गट येथी काजू बागेचा लिलाव घेत होता.यावेळी ग्रामपंचायत व तुळजाभवानी महिला बचत गट वेंगरुळ या दोघनिही वन विभागाकडे लिलावाची मागणी केली होती. डिसेंबर- जानेवारी महिन्यात लिलावसाठी मागणी करूनही वन विभागाने वेळीच दखल घेऊन लिलाव लिलाव प्रक्रिया पार पाडली नाही.जर लिलाव वेळीच झाला असता तर संभदित लिलाव घेणाऱ्याने वनव्याची खबरदारी घेऊन जळीत रेषा काढली असती. त्यामुळे या गायरानात वनवा लागण्याचा प्रश्नंचं उदभवला नसता व झालेली हानी टाळता अली असती .
लिलाव प्रक्रिया पार पाडली नाही.जर लिलाव वेळीच झाला असता तर संभदित लिलाव घेणाऱ्याने वनव्याची खबरदारी घेऊन जळीत रेषा काढली असती. त्यामुळे या गायरानात वनवा लागण्याचा प्रश्नंचं उदभवला नसता व झालेली हानी टाळता आली असती .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here