किर्लोस्करने जपली सामाजिक बांधिलकी,गर्जन येथे संवेदना 2019 कार्यक्रम संपन्न

0
133

कोल्हापूर:
गर्जन ता. करवीर येथे किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी उपक्रम व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, सी. पी. आर. हॉस्पिटल कोल्हापूर च्या वतीने आयोजित संवेदना शोध मोहीम २०१९ कार्यक्रम घेण्यात आला.कार्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या नफ्यातील काही भाग सामाजिक बांधिलकी म्हणून खर्च करण्याचा कायदा आहे.या उद्देशाने गेली पाच वर्षे ‘संवेदना’ हा एड्स जनजागृती चा उपक्रम राबविला जात आहे.अशी माहिती किर्लोस्कर चे शरद अजगेकर यांनी दिली.
यावेळी गर्जन, चाफोडी, मांडरे, आरळे, सावर्डे, म्हालसवडे गावांतून १२०० लोकांच्या एचआयव्ही व रक्त चाचण्या करण्यात आल्या. तसेच गावातून मशाल फेरी, युवक सभा, महिला सभा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास उपसरपंच साधना अरुण देसाई, सी. पी. आर. चे समुपदेशक मकरंद चौधरी, कपिल मुळे,विनायक देसाई, राजेश गोधडे, शुभम पाटील, चंद्रकांत गायकवाड, क्रांतिसिंह चव्हाण, सतिश पाटील, मकरंद चौधरी, कपिल मुळे, लता कांबळे, कोमल
उत्तम चव्हाण, संभाजी कांबळे, गोविंद सुतार, राजाराम नाईक, नारायण पाटील , विलास पाटील, शिवकिरण पेटकर, सुनंदा नाईक, रेश्मा सोनवले, अर्चना देसाई, सुनिता चव्हाण, दिपाली पाटील सुषमा कांबळे, शितल आर्डे आदी उपस्थित होते.आभार किरण चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here